कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई -  मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र दोन महिने उलटण्याआधीच ५,८०० कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचे रस्ते होणार अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा हवेतच विरल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निविदांना अत्यल्प प्रतिसादामुळे निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्या असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत नव्याने निविदा मागवणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (CM Eknath Shinde had announced two months ago that the roads in Mumbai will be made of cement concrete nz)


हे ही वाचा - चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार अशी घोषणा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. मात्र दोन महिन्यांत ५,८०० कोटींच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने २ ऑगस्ट मध्ये निविदा प्रक्रिया सुरु केली होती. पाच निविदांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने निविदा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु या कामांसाठी नव्याने निविदा मागवण्यात येतील, त्यापूर्वी निविदांच्या अटी व शर्तींचे पुनर्विलोकन करण्यात येईल, तसेच गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता जलदगतीने कामे करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करणे या दृष्टीने निर्णय घेवून नवीन निविदा मागवण्यात येणार आहे.


हे ही वाचा - शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात - बाळासाहेब थोरात


 


या अटी शर्तीमुळे अल्प प्रतिसाद!


1.  संयुक्‍त भागीदारीला परवानगी नाही.


2. कामे दुस-या कंत्राटदाराकडे हस्‍तांतरित करण्‍यास परवानगी नाही.


3. पात्रतेचे कडक निकष.


4. राष्‍ट्रीय तसेच राज्‍य महामार्गांचा अनुभव असावा.


हे ही वाचा - गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य...,  संभीजीराजेंचा राज्यभर दौरा!


5. बळकट निविदा क्षमता.


6. काम पूर्ण झाल्‍यावर ८० टक्के रकमेचे अधिदान करण्‍यात येईल व उर्वरित २० टक्के रक्‍कम दोषदायित्‍व कालावधीत अधिदान करण्‍यात येईल.


7. कामाचा दोषदायित्‍व कालावधी १० वर्षे ठेवण्‍यात आला आहे.


8. अत्‍याधुनिक क्‍यूआरकोडचे छायाचित्र बॅरिकेडवर लावण्‍यात येईल, जेणेकरुन सामान्‍य जनतेला कामासंबंधी माहिती मोबाईलवर उपलब्‍ध होईल


9. बॅरिकेडवर जीपीएस ट्रॅकर बसवणे.


10. गुणवत्‍तेत दोष आढळल्‍यास जबर दंडाची कारवाई करण्‍यात येईल.


11.  कंत्राटदाराची स्‍वतःची यंत्रसामग्री असणे आवश्‍यक आहे.


हे ही वाचा - रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद म्हणजे... अमोल मिटकरी यांची पहिली प्रतिक्रिया


12.  कंत्राटदाराकडील कामगार कमीत कमी १ वर्षे कंपनीच्‍या पे-रोलवर असणे आवश्‍यक आहे.


13.  सीसीटीव्‍ही कॅमेरे प्रत्‍येक साईटवर बसविणे.


14.  प्रत्‍येक रस्‍त्‍यावर चर खोदू नये, यासाठी डक्‍ट बांधणे.