गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!

सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.

Updated: Nov 1, 2022, 09:42 PM IST
गाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा! title=
Sambhijirajs tour across the state nz

चेतन कोळस, झी मीडिया, नाशिक - छत्रपती संभाजीराजे यांनी 'स्वराज्य' या नव्या संघटनेची स्थापना केली. सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी, समाजाला दिशा देण्यासाठी आणि शिवछत्रपती आणि शाहू महाराजांचे नाव जगभरात पोहोचवण्यासाठी या पक्षाची स्थापना केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील गावागावांमध्ये स्वराज्य संघटनेची बांधणी करण्याकरिता संभाजी राजे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.  नाशिक जिल्ह्यात 'गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य' या शाखांच्या उद्घाटनाकरिता आले होते.  (Sambhijirajs tour across the state nz)

 

हे ही वाचा - चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात

 

दसऱ्यानंतर  महाराष्ट्रातील गावागावांत स्वराज्य संघटनेची बांधणी आणि  "स्वराज्य"चा विस्तार करण्यासाठी संभाजी राजे हे महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेले आहेत. त्यांनी 3 दिवसात नाशिक जिल्ह्यातील 75 शाखांचे उद्घाटन केले असून आज त्यांनी सिन्नर तालुक्यामधील शाखेचे उद्घाटन केले आहे. अजुनही 35 ठिकाणी जिल्ह्यात उद्घाटन करणार असल्याची माहिती छत्रपती संभाजी राजे यांनी दिली आहे.

 

स्वराज्याचे उद्दिष्ट एका शब्दात सांगणे थोडे कठीण आहे पण हे हे स्वराज्य खऱ्या अर्थाने कष्टकरी, कामगार, शेतकरी, गोर गरीब, त्यांच्यावर जो अन्याय होत आहे. त्या अन्यायाच्या विरोधात लढा उभा करण्यासाठी हे स्वराज्य आहे. स्वराज्य संघटनेची स्थापना सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी झाली असल्याची प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी दिलीय.

 

हे ही वाचा - रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद म्हणजे... अमोल मिटकरी यांची पहिली प्रतिक्रिया

 

आमचं स्वराज्यचं काम चालू....

शिवसेना नेमकी कोणाची ? शिवसेनेच्या सोळा आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा, धनुष्यबाण कोणाला मिळणार अशा विविध मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्ष वर आज सुनवानी होणार होती 29 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आली यावर छत्रपती संभाजी राजे यांना विचारले असता त्यांचं त्यांचं चालू आहे आपण सुद्धा मजा बघूया आमचे स्वराज्यचे काम चालू आहे असे सांगून या विषयाला संभाजी राजे यांनी टाळले.