मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशातील अनेक राज्यांमध्ये (Popular Front of India) PFI विरोधात कारवाई केली आहे. यावरून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. पुण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणाबाजीप्रकरणी पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 PFI कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी समाजकंटकांना रोखठोक इशारा दिला आहे. (CM Eknath Shinde on Pakistan Zindabad slogans in Pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. 


 



देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्यांच्यावर कुठे असतील तिथून शोधून काढून कारवाई करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यासोबच PFI विरुद्ध पुरावे केंद्र आणि राज्य सरकारकडे उपलब्ध आहेत. याबाबतचा तपास चालू असून यामधून अनेक गोष्टी बाहेर येतील. देशात अस्वस्थता पसरवण्याचे षडयंत्र होतं असा आरोपही फडणवीसांनी केला आहे. 


 


पोलिसांनी नारे देणाऱ्यांना अटक केली असून मुख्यमंत्र्यांनीही कारवाईचे आदेश दिले आहेत. 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणांमुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.