औरंगाबाद : कचराप्रश्नावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झालेत. त्यांनी थेट औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी का,असा संतप्त सवाल केलाय. कचरा प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी नागपुरात बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच  खरडपट्टी काढल्याची माहिती मिळतेय.  इतके दिवस झाले मात्र कचरा प्रश्नावर तोडगा का  निघू शकला नाही असा सवाल त्यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारनं मदत केली, पैसै दिले, अजूनही देण्याची तयारी दाखवली मात्र तरीही प्रश्न सुटत नसेल तर ही पालिका बरखास्त का करू नये असा सवाल त्यांनी केलाय. कचऱ्याबाबत काय करता आहात आणि काय करता येईल याचे तातडीने नियोजन करून सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिलंय. त्यामुळं आता कचरा प्रश्नावरून पालिकेची चांगलीच नाचक्की झालीये. या बैठकीला औरंगाबाद महापालिका आयुक्त विनायक निपुण, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी हे सुद्धा उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांना कचऱ्याबाबत एकही अधिकारी  समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.