मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक करत मागितली `ही` मदत : VIDEO
कडबी चौक ते गोळीबार बांधण्यात येणाऱ्या उड्डान पुलाचे भूमीपूजन
नागपूर : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने कडबी चौक ते गोळीबार बांधण्यात येणाऱ्या उडान पुलाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरीं झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असून ते आभासी पद्धतीने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक केलं. मुख्यमंत्री एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी गडकरींकडून जाहीर मदत देखील मागितली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ' नवीन रस्ते अनेक वर्षे टिकतील अशी टेक्नॉलॉजि द्यावी, मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींकडे जाहीररित्या मागितली मदत. तसेच पुढे मुख्यमंत्री म्हणाले की,'राजकीय अडथळे येऊ न देता आपण विकास करू. आपला सहकार्याचा मार्ग नॅरो गेज (narrow gauge) ऐवजी ब्रॉड गेजने पद्धतीने व्हावा, असं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी भाषणाची सुरूवात ही थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कौतुकानेच केली. मुख्यमंत्री म्हणाले की, 'आपलं युती सरकार असताना बाळासाहेबांनी सांगितल्याबरोबर मुंबई-पुणे महामार्ग एक्सप्रेस वेवर बनवला. यामुळे मला आपला अभिमान आहे.
नागपुरातील कडबी चौक ते गोळीबार चौक दरम्यानच्या उड्डाणपुलाचे आज भूमिपूजन होत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय. केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत हा उड्डाणपूल तयार होणार आहे. भाजपाने या कार्यक्रमाला छोटे दक्षिण-पूर्व -मध्य रेल्वेच्या नेरो गेज रेल म्युझियम जवळ हा सोहळा होत आहे. पालकमंत्री नितीन राऊत, सुनील केदार उपस्थित आहे.