मुंबई : आजपर्यंत शिवसेनेचं सत्ताकेंद्र आणि रिमोट कंट्रोल मातोश्रीवर होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान वर्षावर जातील. पण मातोश्रीवरच्या सामानाची बांधाबांध व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीशिवाय उद्धव ठाकरेंच्या वर्षाप्रवेशाला मुहूर्त नसल्याचेच स्पष्ट होत आहे. त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरमधल्या रामगिरीवर वास्तव्याला असणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामगिरी हे नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रामगिरी सज्ज झालंय. 



उद्धव ठाकरे आतापर्यंत मातोश्री सोडून इतके दिवस बाहेर क्वचितच राहिले असतील. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान किमान सहा दिवस उद्धव ठाकरे सहकुटुंब रामगिरीमध्ये राहणार आहेत.


तोपर्यंत वर्षाही सज्ज होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे दोघेही एकाच वेळी वर्षामध्ये वास्तव्य करणार, हे यानिमित्तानं पहिल्यांदाच घडणार आहे.