Cricket सामन्यादरम्यान जेव्हा मैदानावर झाली कोंबड्याची एन्ट्री, पाहा Video
जेव्हा एक न बोलावलेला पाहुणा मैदानावर आला. या पाहुण्याची एन्ट्री कॅमेऱ्यात कैद झाली.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी अशा घटना घडतात ज्याची कोणी कधी अपेक्षाही केली नसेल. काही घटना या मनोरंजक असतात तर काही गंभीर. अशीच एक मनोरंजक घटना कॅरेबियन प्रीमियर लीग 2021 (CPL 2021) मध्या पाहायला मिळाली. जेव्हा एक न बोलावलेला पाहुणा मैदानावर आला. या पाहुण्याची एन्ट्री कॅमेऱ्यात कैद झाली.
सेंट किट्स एंड नेविस पॅट्रीअट (St Kitts and Nevis Patriots) आणि गुयाना आमेजन वॉरियर्स (Guyana Amazon Warriors) यांच्यात सुरु असलेल्या सामन्या दरम्यान अचानक मैदानात एक कोंबडा आला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
सीपीएल 2021 (CPL 2021) च्या 8 व्या सामन्यात सेंट किट्स एंड नेविस पैट्रीअट (St Kitts and Nevis Patriots) बॅटींग करत असताना 10 व्या ओव्हरमध्ये मैदानात कोंबडा शिरला. बराच वेळ तो मैदानात फिरताना दिसला.
सीपीएल 2021 (CPL 2021) ने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.