मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : पालघर जिल्ह्यतल्या एका मनोरुग्णाच्या पोटात चक्क ७२ नाणी आढळून आली आहेत. गेल्या १० ते १५ वर्षांपासून हा रुग्ण नाणी गिळत होता. साडेतीन ते चार तास दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेनंतर यशस्वीपणे ही नाणी कढण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही नाणी कुठल्या संग्रहालयातली नाहीत. तर एका मनोरुग्णालयाच्या पोटातून ती काढण्यात आली आहेत. पालघर जिल्ह्यातल्या थोरात पाडा या आदिवासी पाड्यावरचा हा ५० वर्षीय रुग्ण आहे. गेली दहा ते पंधरा वर्षं तो नाणीच गिळत होता. नैसर्गिक क्रियेद्वारे ती नाणी शरीरातून बाहेर पडत होती. गेल्या दोन तीन वर्षांपासून त्याच्या शरीरातून नाणी बाहेर पडायचं प्रमाण हळूहळू कमी झाले. त्यामुळे त्रास झाला म्हणून डॉक्टरांना दाखवलं असता, हा प्रकार उघड झाला. 


नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरील खासगी रुग्णालयात या रुग्णावर तब्बल साडे तीन ते चार  तास दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली. यात एक दोन नाही तर तब्बल १६३ रुपये किंमतीची ७२ नाणी, तसंच वायसर आणि नटबोल्ट त्याच्या शरीरातून काढण्यात आले.


हा रुग्ण बेझॉर अथवा पायका या आजाराने बेजार आहे. एक लाख लोकांमागे एखाद्याला अशा स्वरुपाचा आजार असतो. या रोगाचं निदान लवकर झालं नसतं, तर कदाचित ते त्याच्या जीवावरही बेतू शकलं असतं.