पुणे : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राजधानी मुंबईतही गार हवा सुटली असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही चांगलीच हुडहुडी भलली आहे. नाशिक येथे गोदाकाठी .95 अंश सेल्सिअसची नोंद झाली. तर, कोल्हापूरात थंडीने एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.


वातावरणात मोठे बदल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अलिकडील काही दिवसात राज्यातील वातावरणात कमालीचा बदल पहायला मिळत आहे. अवेळी पडणारा पाऊस, त्यानंतर अचानक वाढणारे उन, वातावरण कोंदट होऊन उकाडा वाढणे तर, त्यानंतर मोठ्या दिसणारे धुके आणि आता थंडीचा कडाका असे संमिश्र वातावरण राज्यात दिसत आहे. त्यामुळे वातावरणात लक्षणीयरित्या बदल झाल्याचे पहायला मिळते आहे. सध्या थंडीचाच काळ असला तरी, काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली होती.


काही काळ राहणार थंडीचा कडाका


दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी थंडीचा पारा घसरला असून, तो 10 ते 11 अंश सेल्सिअसवर आला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. तर, खान्देशालाही चांगलीच हुडहुडी भरली आहे. नाशिकही कमालीचे गारठले असून, तेथे पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. पुण्यातही अशीच स्थिती असून, 10.1 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. दरम्यान, येत्या काही काळापर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळांनी वर्तवला आहे.


कोल्हापुरात थंडीने घेतला बळी


कोल्हापुरातही थंडीचा कडाका चांगलाच वाढवा आहे. कोल्हापूरातील बोचऱ्या थंडीने एकाचा बळी घेतला आहे. ही घटना रंकाळा तलाव परिसरातील तांबट कमानीनजीक घडली. येथे 45 वर्षीय एका फिरस्त्या पुरूषाचा देह मृतावस्तेत जुना राजवाडा पोलिसांना रविवारी सकाळी आढळला. पोलिसांनी हा मृदतेह सीपीआर रूग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांन हा व्यक्ती मृत झाल्याचे घोषीत केले.


राज्यातील प्रमुख शहरे आणि किमान तापमान


(अंश सेल्सिअसमध्ये)

शहर तापमान
मुंबई २०़५
सांताक्रुज १६़६
अलिबाग १७़७
रत्नगिरी   १८़४
पणजी   १८़८
डहाणू  १७
भिरा  १४़५
पुणे १०़६
जळगाव १०़२
कोल्हापूर  १५़९
महाबळेश्वर १३़३
मालेगाव १०़२
नाशिक ९़५
सांगली १३़७
सातारा ११़४
सोलापूर १३़१
उस्मानाबाद  १०़५
औरंगाबाद १०़४
परभणी  १०़६
नांदेड १२
अकोला १०़४
अमरावती १२़६
परभणी १४
ब्रह्मपूरी  ९़६
चंद्रपूर   १३़६
गोंदिया   ९़८
नागपूर ९़८,
वर्धा  १०़९
यवतमाळ १३़