मुंबई : घरगुती सिलेंडरवरील अनुदान संपुष्टात येणार आहे.  सरकारने अनुदानात कपात केल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसणार आहे.. केंद्र सरकारने घरगुती सिलेंडरवरील मिळणाऱ्या अनुदानात 270 वरून थेट 40 रूपये कपात करण्यात आलीय. फेबुवारी माहिन्यात दोन वेळ गॅस दरवाढ झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गॅसच्या दरात एकूण ७५ रुपयांची दरवाढ झालीय. तसेच सरकारने अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा कोटा कमी केल्याने ग्राहकांना मिळणारं अनुदानही कमी येऊ लागलंय. 



सध्या एका विना अनुदानित सिलिंडरसाठी ८२१ रुपये मोजावे लागत आहेत. त्यावर केवळ ४० रुपये अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडर ७८१ रुपयांचे पडत आहे.


आता सिलिंडरच्या किंमती किती ?


घरगुती गॅस (LPG Cylinders)च्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ झाल्यानंतर दिल्लीत एलपीजीची किंमत 719 रुपये झालीय. आजपासून म्हणजेच 4 फेब्रुवारीपासून हे दर लागू झालेयत. डिसेंबरमध्ये IOC ने घरगुती गॅसच्या किंमती दोनवेळा वाढवल्या. कंपनीने 2 डिसेंबरला 50 रुपयांनी वाढ केली. त्यानंतर 15 डिसेंबरला 50 रुपये आणखी वाढवले.


190 रुपयांनी वाढल्या किंमती 


याआधी 1 फेब्रुवारीला कमर्शिअल एलपीजी (19kg) चे दर 190 रुपयांनी वाढले. ज्यामध्ये आतापर्यंत 6 रुपयांची कपात झालीय. मुंबईत कमर्शिअल सिलिंडरची किंमत 1482.50 रुपये आहे.


असे पाहा तुमच्या शहरातील दर 


तुम्ही काही मिनिटात तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती तपासू शकता. यासाठी तुम्हाला सरकारी तेल कंपन्यांच्या वेबसाईटवर जावे लागेल. इथे कंपन्या नवे दर जाहीर करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकवर तुम्ही शहरातील गॅस सिलिंडरचे दर तपासू शकता.