नागपूर : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी बंदची हाक दिली आहे.


राजकीय पक्ष बंदपासून दूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ राज्य आंदोलन समितीने आज विदर्भ बंदची हाक दिली आहे. विविध विदर्भवादी संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला असला तरी प्रमुख राजकीय पक्ष या बंदपासून दूर आहे. या बंदसाठी विविध विदर्भवादी संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासून जनजागरण केले. याकरता  विदर्भाचा दौरा केला. ठिकठिकाणी मेळावे, बैठका घेऊन सर्वसामान्यांना देखील आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.


बंदला संमिश्र प्रतिसाद


हिल्या दिवशी पुकारलेल्या विदर्भ बंदला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानुसार आज सकाळपासूनच विदर्भवाद्यांनी व्यापाऱ्यांना प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. सोबतच शाळा महाविद्यालयही बंद करण्यात आले.


वेगळ्या विदर्भाची मागणी


यवतमाळसह उमरखेड, वणी, मारेगाव, नेर, याठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.  भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने वेगळ्या विदर्भाचा ठराव संमत केला. तसेच, गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी वेगळ्या राज्याचे आश्वासन दिले. राज्यात सत्ता आल्यापासून भाजपने मात्र, वेगळ्या राज्याचा मुद्दा बासनात गुंडाळला. त्यामुळे हा बंद पुकारण्यात आला.


पाहा बातमीचा व्हिडिओ