काँग्रेसचे आंदोलन आक्रमक; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी अक्षरशः उचलून नेले
काँग्रेसचे आंदोलन आक्रमक झाले. आंदोलनात सहभागी झालेले प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पोलिसांनी अक्षरशः उचलून नेले आहे.
Nagpur assembly session: नागपुरात विविध मागण्यांसाठी काँग्रेसने मोर्चा काढला आहे. हा मोर्चा चिघळला आहे. सरकारविरोधता काँग्रेस आक्रमक झाला आहे. रस्त्यावर उतरलेल्या नेत्यांना पोलिसांनी उचलून नेले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देखील पोलिसांनी उचलून नेले आणि ताब्यात घेतले. अनेक काँग्रेस नेत्यांची पोलिसांनी धरपकड केली आहे.पोलिसांनी अटक केली तरी युवकांच्या प्रश्नांवर लढत राहू, असा निर्धार नाना पटोले यांनी व्यक्त केला. नाना पटोले हे ठिय्या आंदोलनावर ठाम होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ऑनलाईनच्या नावाखाली तरुणांना लुटलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी 40 हून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.
नागपूर अधिवेशनात दुस-या दिवशी विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाले. विधीमंडळाच्या पाय-यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. कापूस आणि धानाच्या प्रश्नावर विरोधकांनी हे आंदोलन केलं. अवकाळी नुकसानाबाबत मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.