सातारा : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ते साताऱ्यातील दक्षिण कऱ्हाडमधून विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवावी, असा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी नेत्यांचा आग्रह आहे. मात्र लोकसभेऐवजी विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन ते याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहेत.


गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानसभा तसेच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र आता विधानसभा निवडणूकीच्या घोषणेनंतर, ते सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


त्यामुळे आता काँग्रेस साताऱ्यात पोटनिवडणुकीसाठी उदयराजेंविरोधात कोणता उमेदवार लढवणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.