नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत लढण्यास तयार असल्याचे संकेत कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी दिले आहेत तसेच राज्यात कॉंग्रेसची जबाबदारी दिल्यास ती देखील स्वीकारण्यास तयार असल्याचे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाने आदेश दिले होते म्हणून लोकसभा नागपुरातून लढलो. पक्षाने आदेश दिले तर विधानसभा देखील लढण्यास तयार असल्याचे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी निष्पक्ष पद्धतीचा अवलंब केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. यामुळेच माझ्यासह कॉंग्रेस कार्याकर्त्यां गुन्हे दाखल केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या विरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेनुसार न्यायालयात दाद मागणार असल्याचेही पटोले यांनी सांगितले.



निवृत्ती नाही 


तसेच राजकारणातून निवृत्तीचा कुठलाही विचार नसून विरोधक म्हणून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवू असेही नाना पटोले म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त नाना पटोले यांनी नितीन गडकरी यांना यावेळी शुभेच्छा दिल्या.