मुंबई : Congress leader Rahul Gandhi will visit Maharashtra : राज्यात काँग्रेस पुन्हा सक्रीय झाली आहे. महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. आता काँग्रेसमध्ये नवं चैतन्य आणण्याचा प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. तब्बल हा दौरा 16 दिवसांचा असणार आहे, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज विधानभवनात बैठक झाली. यावेळी जीएसटी आणि महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करण्याबाबत व्युहरचना आखण्यात आली. तसेच राज्यातील आगामी रणनीती याबाबत बैठकीत चर्चा केली. राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातील दौरा होणार आहे. त्याबाबतही चर्चा करण्यात आली. या दौऱ्याचे नियोजन कसे असावे, याबाबत विचारविनिमय करण्यात आला.


आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसची रणनीती आखण्यात येणार आहे. भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस मैदानात आक्रमक पद्धतीने उतरणार आहे. त्यासाठीच हा राहुल गांधी यांचा दौरा आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले. महत्वाचे म्हणजे राहुल गांधी यांचा राज्यात हा सोळा दिवसांचा दौरा आहे. महाराष्ट्रातील समन्वयाची जबाबदारी माजी महसूलमंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. काँग्रेसच्या बैठकीला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, वर्षा गायकवाड,चंद्रकांत हंडोरे, नसीम खान आदी नेते उपस्थित होते.