यवतमाळ : यवतमाळच्या राळेगाव जंगल परिसरात 13 जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक टि वन वाघिणीला ठार मारल्यानंतर प्राणी मित्रांकडून वनमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. वाघिणीचा जीव घेण्याऐवजी तिला पिंजऱ्यात कैद करून ठेवता आलं असंत असं मत काहींनी मांडलं. वाघिणीला मारून वनमंत्र्यांना जनतेमध्ये 'हिरो' बनायचं होत अशी टीकाही काहींनी केली. काँग्रेस तसेच शिवसेनेकडूनही असेच गंभीर आरोप झाले. पण कॉंग्रेसच्या आमदारांनी मात्र वनविभागाच्या निर्णयाचे समर्थन केलंय. यवतमाळातील काँग्रेस नेत्यांनी मात्र वाघिणीला ठार मारल्या प्रकरणी समर्थन केलंय. माजी मंत्री शिवाजीराव मोघे तथा व काँग्रेस आमदार हरिभाऊ राठोड यांनी 'वनविभागाने वाघिणीला ठार मारून चांगलं काम केलं' अशी प्रतिक्रिया दिलीयं.


'लोकांचाही विचार करावा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'या वाघिणीला आधीच ठार मारायला हवं होतं परंतु सरकारने उशीर केला, प्राण्यांपेक्षा माणसांचे जीव महत्त्वाचे आहे, हा विषय भावनात्मक करणाऱ्यांनी लोकांच्या जीवाचाही विचार करावा' असे शिवाजीराव मोघे यांनी म्हटले.


'जनता दहशत मुक्त'


 'बकरी,वाघ हे सर्व प्राणी सारखेच त्यामुळे एका वाघिणी ला ठार मारल्यानंतर फार नुकसान किंवा पाप झाले असे म्हणणे चुकीचे उलट वाघिणीला ठार मारले याचा आनंद झाला. जनता दहशत मुक्तजनता दहशत मुक्त झाली,' अशी प्रतिक्रिया आमदार हरिभाऊ राठोड यांनी दिलीयं.