नागपूर : विदर्भात काँग्रेस- राष्ट्रवादी पाच जागा जिंकणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तसंच गडकरींचाही पराभव होणार असल्याचं भाकित त्यांनी वर्तवले आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस राष्ट्रवादीतली धूसफूस पुन्हा समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणुकीपासून आजपर्यंत राष्ट्रवादीने आपल्याशी संपर्कच केला नसल्याचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा आढावा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आमदार, लोकसभेचे उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेसने बैठक बोलावली होती. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिले.