Congress NCP Workers Join BJP Party :  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई (Former minister Subhash Desai)  यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. यामुळे उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का बसला आहे. दुसरीकडे शिंदे सोबत सत्तेत असलेल्या भाजपची देखील ताकद वाढली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह तब्बल 700 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. यात काँग्रेसचे वाशिमचे माजी खासदार अनंतराव देशमुख, नाशिकचे राष्ट्रवादीचे माजी खासदार वसंतराव पवार यांच्या कन्या अमृता पवार, शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कन्या तनुजा घोलप यांच्यासह कोल्हापूरचे माजी मंत्री बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू बाळासाहेब कुपेकर यांनी भाजपात प्रवेश केला आहे. 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State BJP President Chandrashekhar Bawankule)यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा रंगला. 
पक्ष प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


अनंतराव यांनी भाजप मधे प्रवेश करावा अशी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. मनापासून सर्वांचे स्वागत करतो. ज्या जनतेने करीता पदाधिकाऱ्यांकरिता प्रवेश केला त्याला प्राधान्य दिलं जाईल. आपल्या अनुभवाचा फायदा मिळेल असे फडणवीस म्हणाले. अमृता पवार यांच्याकडे भाजप पक्ष प्रवेशासाठी पाठपुरावा सुरु होता यात देखील यश आले आहे. तनुजा घोलप यांच्या मुळे नाशिक जिल्ह्यात याचा फायदा होईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. अनंतराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 750 कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. 2024 मध्ये निवडणूक येईल तेव्हा अजून काही प्रवेश होईल असा दावा देखील भाजप नेत्यांनी केला आहे. 


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.  यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने राज्यात नवे सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिंदे गटाला मिळणारा पाठिंबा वाढत आहे. अनेक आमदार, नगरसेवकांसह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, दुसरीकडे भाजप पक्षात देखील मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे.