दीपक भातुसे, प्रतिनिधी, मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याबरोबरच काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १२ तारखेला सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील. अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सुजय विखे पाटील हे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा यासाठी प्रयत्नशील होते. पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचं घोडं पुढे सरकरलं नाही, आणि निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे.


लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार, तारखा जाहीर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी १२ मार्चला सुजय विखे पाटील मुंबईच्या भाजप मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील. नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं सोडली असती तर सुजय विखे पाटील काँग्रेसच्याच तिकीटावर निवडणूक लढवण्याची शक्यता होती. यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीनं ही जागा सोडावी म्हणून स्वत: राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील होते. पण राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा सोडायला अद्यापही तयार नाही. यामुळे मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये सुजय विखे पाटील भाजप नेत्यांना भेटत आहेत. यामुळे त्यांचा भाजप प्रवेश होणार ही चर्चा सुरु होती. राधाकृष्ण विखे पाटील मात्र काँग्रेस सोडणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.  या सगळ्यात मोठी अडचण राधाकृष्ण विखे पाटलांची होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच पळवून भाजपानं काँग्रेसला मोठा दणका दिला आहे. 


 


 


लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत पार पडणार, २३ मे रोजी निकाल