पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा; उदयनराजे भोसले यांचा गंभीर आरोप
lok sabha election 2024 : भाजपचे साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Udayanraje Bhosale : भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसलेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.. पुरावे आणि लोकांना गायब करण्याची काँग्रेसची परंपरा असल्याचा आरोप उदयनराजेंनी केलाय.. राजेश पायलट, माधवराव सिंदिया तसंच वायएसआर यांचे अपघात का झाले ते तपासा. त्यातून सर्व समजेल असा सनसनाटी आरोप करत उदयनराजेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
राजेश पायलट, माधवराव सिंदिया आणि वायएसआर यांचा संदर्भ देत उदयनराजेंनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप केले. विशेष म्हणजे या तिघांचेही वारस याघडीला देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत.. त्यापैकी कुणीही कधीही वडिलांच्या मृत्यूवरुन शंका उपस्थित केली नाही. त्यामुळेच उदयनराजेंनी केलेल्या आरोपांमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या आरोपाला बाळासाहेब थोरात यांचे प्रत्युत्तर
साता-याचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या आरोपाला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांचं वक्तव्य पूर्णपणे तर्कहीन असल्याचं थोरातांनी म्हटलंय. त्यांनी काहीही बोलाव आणि आम्ही उत्तर द्यावं असं काही नाही. ते विधान तर्कहीन असल्याचं थोरात म्हणाले. दरम्यान उदयनराजेंनी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत. लोकं गायब करण्याची परंपरा काँग्रेसची असल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला. त्यांनी राजेश पायलट, माधवराव सिंदिया आणि वायएसआर यांचाही दाखला दिलाय. राजे यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडालीय.
भाजपमध्ये गेलो असतो आणि निरम्यासारखा साफ झालो असतो - शशिकांत शिंदेंचा टोला
साता-यात शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून उदयनराजेंनी शरद पवारांना टोला लगावलाय. साता-यात चारित्र्य संपन्न माणूस का मिळाला नाही? असा सवाल विचारत यशवंत विचार सांगणा-यांच्या आजूबाजूला भ्रष्टाचारी आहेत अशी टीका उदयनराजेंनी केली. तर भ्रष्टाचारी असतो तर भाजपमध्ये गेलो असतो आणि निरम्यासारखा साफ झालो असतो असा पलटवार शशिकांत शिंदेंनी केला.
29 एप्रिलला कराडमध्ये मोदींची भव्य सभा
महायुतीचे साता-याचे उमेदवार छत्रपती उदयनराजेंच्या प्रचारासाठी महायुतीकडून जोरदार तयारी करण्यात येतेय.त्यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान मोदी साता-यात येणारेत. येत्या 29 एप्रिलला कराडमध्ये मोदींची भव्य सभा पार पडणारेय. या सभेला अनेक ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती असेल. यावरून उदयनराजेंना निवडून देण्यासाठी महायुतीकडून चांगलाच जोर लावल्याचं दिसून येतंय. सध्या महायुतीकडून सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आलीये. साता-यात छत्रपती उदयनराजेंची लढत मविआच्या शशिकांत शिंदेंशी होतेय.