नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची बाजी
उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता पाटील या विजयी झाल्यात. पाटील या १७३६ मतांनी विजयी झाल्यात.
धुळे : उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातील नवापूर नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार हेमलता पाटील या विजयी झाल्यात. पाटील या १७३६ मतांनी विजयी झाल्यात.
भाजपला दे धक्का
या ठिकाणी भाजपला एकही जागा मिळालेली नाही. भाजपचा धुव्वा उडाला आहे. खासदार हिना गावित यांच्याकडे भाजपची जबाबदारी होती. मात्र, भाजपला येथे यश मिळाले नाही. काँग्रेसने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. काँग्रेसने १४ जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादीने ४ जागा पदरात पाडल्यात. शिवसेना आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागावर समाधान मानावे लागले.
पालिकेतील पक्षीय बलाबल
एकूण जागा - २०
काँग्रेस - १४
राष्ट्रवादी - ४
शिवसेना- १
अपक्ष - १
नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पराभूत
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील वाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपला जोरदार दणका मिळालाय. शिवसेनेच्या गीतांजली कोलेकर या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्यात. त्यांनी भाजपच्या उमेदवार निशा सवरा यांचा पराभव केला आहे. निशा सवरा या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या कन्या असून सवराना रोखण्यात सेनेला यश आले आहे.
तर शिवसेना ६, भाजप ६ , काँग्रेस २, बहुजन विकास आघाडी २ तर राष्ट्रवादी १ असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष उमेदवारांना मतदारांनी अजिबात स्वीकारले नाही.