मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? CM शिंदे म्हणाले, `मी टीमचा लीडर...`
Cm Eknath Shinde: विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. मतदानासाठी अवघे 20 दिवस उरले आहेत. राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे.
Cm Eknath Shinde: 26 नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. त्याआधी सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू होतील. विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार. मात्र, अद्याप महायुती व महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाहीये. महायुतीत मुख्यमंत्रीपदी कोणाचा चेहरा असणार, याबाबत तर्क वितर्क लढवत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे.
विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा शुभांरभ झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. शिंदेंना महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असेल असं विचारण्यात आल्यावर त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आता सध्या मी या टीमचा लीडर आहे. आमची टीम काम करतेय.
'आमच्याकडे पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर असं काही नाहीये. आम्ही टीम म्हणून काम करतो. तर, विरोधीपक्षात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन चढाओढ सुरू आहे. हे काय सुरू आहे. अरे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं याचा विचार करणारे लोकं हवेत. आज महाविकास आघाडीमध्येच एकमत नाहीये तर महाराष्ट्राच्या जनतेला तरी कसं ते पसंत असेल. म्हणूनच आमच्यात कोणतीही शर्यत नाही. आमचं लक्ष्य एकच आहे महायुतीचे सरकार आणणे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमची टीम आहे आहे आमचा एकमेकांप्रती आदर सन्मान आहे. पद कायम नसते त्यामुळं आमच्यात कोणतीही शर्यत नाही, असंही शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, स्वार्थासाठी ठाकरे काँग्रेस सोबत गेले. शिवसेना संपुष्टात येत असल्यानं आम्ही भाजप सोबत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.