अंबरनाथ : पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतपणे फ्लॅट बांधून त्याची विक्री करणा-या बांधकाम व्यावसायिकाविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाजी कृपा या इमारतीतच्या तळमजल्यात अनधिकृतपणे दोन फ्लॅट बांधून ते कान्हयालाल आणि त्यांच्या बंधूंना विकण्यात आले. 


इमारतीच्या बांधकामाचा बनावट नकाशा दाखवून फ्लॅटला परवानगी असल्याचं सांगत हे दोन्ही फ्लॅट कन्हैयालाल आणि त्यांच्या भावाला २८ लाखांना विकले. मात्र या फ्लॅटवर लोन देण्यासाठी बँकेनं नकार दिल्यावर वाघेलांना शंका आली. त्यांनी अंबरनाथ पालिकेत या इमारतीबाबत चौकशी केली असता तळमजल्याचे फ्लॅट हे अनधिकृतपणे बांधले असल्याचं त्यांना समजलं.


याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक अमित आणि सुमित मुसळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.