पुणे : शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिह ठाकूर हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. एककीडे नरेंद्र मोदी शहीदांचा अपमान करत मत मागत आहे. तर भाजपमधील लोक अश्या प्रकारे बेताल वक्तव्य करत आहे. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि येत्या निवडणुकीत जनतेने यांना जागा दाखवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन तुपे यांनी केले. पुण्यात बालगंधर्व चौकात साध्वी प्रज्ञा सिह यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या तसेच जोडो मारो आंदोलन करण्यात आले. नंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी साध्वी यांचा फोटो जाळून निषेध केला.



 छगन भुजबळांनी केला निषेध



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएस अधिकारी हेमंत करकरे हे सद्गृहस्थ होते एका चांगल्या अधिकाराबद्दल साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शाप असल्याचे उद्गार काढणे हा त्यांचा अपमान आहे या वक्तव्याचा मी निषेध करतो, असं सांग छगन भुजबळ यांनी साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या या बाबतीत कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच मायावती यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी असल्याच्या या विधानाचा समाचार घेत ओबीसींसाठी दोघांनी केलं काय असा सवालही छगन भुजबळ यांनी केला आहे.


सरकारी वकील निकम यांनी केला निषेध


साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्याची सर्वच स्तरातून टीका होत असून वरिष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील याचा निषेध करीत मुंबईवर २६ -११ ला झालेला दहशतवादी हा हल्ला हा एकप्रकारे युद्धच होते असे मत न्यायालयाने मान्य केले आहे या शिवाय अजमल कसाबने देखील या वेळी झालेल्या गोळीबारात करकरे ,कामटे आणि आणि अन्य लोक ठार झाल्याचे मान्य  केले असताना देखील केवळ राजकीय हेतूसाठी असे वक्त्यव्य  करणे चुकीचे असून असे वक्तव्य करणाऱ्यांनी आपली जीभ संभाळावी असा इशारा देखील त्यांनी दिला. 


मोदी आणि भाजपची भूमिका काय?


साध्वी प्रज्ञासिंह यांनी हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. राजकारण खालावल्याचे हे ज्वलंत उदाहरण असून साध्वी प्रज्ञासिंह यांच्या विधानाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची भूमिका काय, हे स्पष्ट झाले पाहिजे. मोदी आणि अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.