`आ..रा..रा..रा` या वादग्रस्त गाण्याची चौकशी होणार
`मुळशी पॅटर्न` या चित्रपटातील गाण्याची चौकशी होणार
पुणे : 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातील 'आ रा रा रा' या वादग्रस्त गाण्याची चौकशी होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस या गाण्याची आणि त्यातील आक्षेपार्ह दृष्यांची चौकशी करणार आहेत. वादग्रस्त ठरलेल्या या गाण्याची निश्चित चौकशी केली जाईल अशी माहिती, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.
'आ..रा..रा' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात
या गाण्यात काही नामचीन गुंडांचा समावेश आहे. तसेच वादग्रस्त बिल्डर आणि तलवारीने केक कापण्याची दृश्य या गाण्यात आहेत. त्यामुळे, युवकांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी हा चित्रपट काढण्यात आला आहे. मात्र या गाण्यामुळं हा चित्रपट तरुणांना गुन्हेगारीकडे आकर्षित तर करणार नाही ना, असा आक्षेप घेतला जात आहे.