मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर थांबण्याचं नाव घेत नाहीये. कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ आता हळूहळू आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्ह आहेत. येणाऱ्या काळात कोरोना थोपवण्यात जर यश आलं नाही तर ही परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे रुग्णालयांवर मोठा ताण येण्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात पुणे आणि नागपूर ही 2 शहरं अशी आहेत. जेथे कोरोना रुग्णांची संख्या ही दररोज वाढत आहे. ही दोन्ही ही शहरं कोरोनाचा हॉटस्पॉट होत चालली आहेत.


नागपुरात आज 55 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये शहरात 31, ग्रामीणमध्ये 20 आणि जिल्ह्याबाहेरील 4 जणांचा समावेश आहे. आज नागपुरात तब्बल 3,177 कोरोनाबधित वाढले आहेत. ज्यामध्ये शहरात 2222 आणि ग्रामीणमध्ये 951 रुग्ण आहेत. तर आज 2600 जणांनी कोरोनावर मात केली आहे.


पुण्यात आज दिवसभरात 2547 रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात आज 2771 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यात आज 32 रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. पुण्यात 674 क्रिटिकल रुग्ण आहेत. ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत.


पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या आता 261659 इतकी झाली आहे. पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 32875 इतकी आहे. आतापर्यंत पुण्यात एकूण मृतांचा आकडा 5243 इतका आहे. आज 15153 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.