अमरावती : दिवसागणिक कोरोनाचे संकट (Corona crisis) वाढताना दिसत आहे. (Coronavirus in  Amravati) कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याने अखेर अमरावती शहराला जोडणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. 


अमरावती शहरातही 30 पेक्षा अधिक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. सोबतच आता अमरावती शहराला जोडणाऱ्या सर्व सीमा सील करण्यात आल्या असून प्रत्येक सीमेवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणार्‍या व शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. 


दरम्यान, जे लोक अत्यावश्यक सेवेत आहे, जे लोक वैद्यकीय सेवेसाठी शहरात येत आहेत, त्यांना फक्त शहरात येण्याची मुभा दिली जात आहे. जे लोक विनाकारण काम नसताना शहरात येतात अशा लोकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. 


याआधी 30 एप्रिलला  आंतरजिल्हाही सीमा सील करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यानुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणजे आता जिल्हा सीमा सील करण्यात आल्या आहेत. तसेच आंतरजिल्हाही सीमा सील करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.


महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांनी मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून सीमा सील करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 40  किलोमीटर लांब असलेल्या, बेरागड गावाच्या सीमेवर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश पोलिसांनी, मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण टाकून दोन्ही राज्याच्या असलेला मुख्य रस्ता बंद केला आहे.