पुणे : बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३१३ जणांचा समावेश आहेत. यात महिलांचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्व लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आणले. या ठिकाणी त्यांना योगासन करण्याचे धडे शिकवलेत. तसेच त्यांना सामूदायिक शपथ दिली. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे. राज्यात कोरोनाचा फैलाव थांबायचे नाव घेत नाही. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकां घरीच थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एवढे करुनही लोक घराबाहेर पडत आहेत.



बारामती शहरात संचारबंदी असताना मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांवर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी हे लोक घराबाहेर पडले होते. शहरात पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून या लोकांना ताब्यात घेतले आहे.