कोरोनाचा उद्रेक, राज्यात आणखी एका जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन
लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यावर आणि बाजारात गर्दी करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ध्यात (Coronavirus in Wardha) आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
वर्धा : लॉकडाऊन असतानाही नागरिक रस्त्यावर आणि बाजारात गर्दी करत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी वर्ध्यात (Coronavirus in Wardha)आजपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. आता जिल्हयात 8 ते 13 मे याकालावधीसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत होती. याचा परिणाम, जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत होती. त्यामुळेच संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. (Corona crisis, lockdown in Wardha district from today)
आजपासून सकाळी 7 पासून 13 मे सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांना पार्सल सुविधेचीच परवाणगी दिली गेली आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
आजपासून काय बंद
1 सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी,बेकरी, मिठाई पिठाची गिरणी इत्यादी दुकाने तसेच खाद्यपदार्थाची सर्व दुकाने बंद राहील. (कोंबडी, मटन, पोल्ट्री, मासे व अंडी यासह)
2 पाळीव प्राण्याच्या खाद्यपदार्थाची दुकाने, पावसाळयाच्या हंगामात व्यक्तीसाठी तसेच संस्थासाठी सबंधीत असणा-या साहित्याच्या निगडीत दुकाने.
3. गॅस एजन्सी
अपवादात्मक हे राहणार सुरु
हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी सकाळी 11 ते रात्री 8
दुध संकलन केंद्रे व घरपोच दुध वितरण व्यवस्था सकाळी 7 ते 1 1 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहिल
बंद असणारे दुकाने संस्था
1.कृषि उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी सबंधीत दुकाने. मात्र
शेतक-यांना आवश्यक त्या वस्तुचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्तरावर संबधीत कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांची राहील.
2.सार्वजनिक , खाजगी क्रिंडागणे, मोकळया जागा, उद्याने, बगिचे.
3.केशकर्तनालय, सलुन, स्पा, ब्युटीपार्लर , शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद. तथापी ऑनलाईन शिक्षण सुरु राहील.
4.लग्न समारंभ , स्वागत समारंभ, मंगल कार्यालये, हॉल, चित्रपट गृहे, व्यायामशाळा, , जलतरण तलाव, करमणुक व्यवसाय, नाटयगृह, कलाकेंद्र, प्रेक्षकगृह, सभागृह
5. चष्म्याची दुकाने बंद राहिल, मात्र आपातकालीन परिस्थितीत रुग्णांस डोळयांच्या डॉक्टरांनी त्यांच्या दवाखान्याला जोडण्यात आलेल्या चष्मा दुकानातुन चष्मा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राहील.
6.नागरी भागातील पेट्रोलपंप बंद राहतील. परंतु रुग्णवाहिका, शासकिय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे वाहनाकरीता पेट्रोल डिझेल उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी कंपनी चे अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिका-यांची राहिल.
7.सर्व शासकिय , निमशासकिय, खाजगी कार्यालये व आस्थापना, वित्त व्यवसायाशी निगडीत सर्व कार्यालये. (ऑनलाईन पध्दतीने कामकाज सुरु ठेवता येईल. )
8. सर्व बँका, पतसंस्था, पोष्ट ऑफिस नागरिकांसाठी बंद राहतील. मात्र कार्यालयीन वेळेत प्रशासकिय कामासाठी सुरु राहील.
9.आपले सरकार सेवा केंद्रे व सेतु केद्रे नागरिकासाठी बंद राहिल तर नागरिकांना घरून ऑनलाईन स्वरुपात प्रमाणपत्र व सुविधा करीता अर्ज सादर करता येईल. दस्त नोंदणीचे काम बंद राहील.
10. शासकिय कार्यालये अभ्यागतासाठी बंद राहील.
11. सार्वजनिक तसेच खाजगी बस वाहतुक , रिक्षा, चारचाकी, व दुचाकी वाहन यांची वाहतुक पुर्णपणे बंद राहील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
सुरु राहणारे व्यवसाय आणि संस्था
1.खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा
2.मेडीकल स्टोअर्स व दवाखाने तसेच ऑनलाईन औषध सेवा 24 तास सुरु राहील.
3.अत्यावश्यक सेवा व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याशी संबधित शासकिय, निमशाकिय कार्यालये
4. एमआयडीसी, उद्योग, कारखाने, सतुगिरणी येथे केवळ कंपनीच्या परिसरात राहणाऱ्या कामगार व कर्मचारी यांनाच परवानगी राहील.
5.शासकिय यंत्रणा मार्फत मान्सुपुर्व विकासकामे आवश्यक पाणीपुरवठा व टंचाई विषयक कामे चालु राहिल. यंत्रणांना वेगळया परवाणगीची आवश्यकता राहणार नाही.
घरपोच सेवा पुरविणाऱ्यांना आर. टी. पी. सी. आर. आवश्यक तसेच संबंधित दुकानाचे ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुसार कारवाई करण्यात येईल.