कोरोनाचे संकट : संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान
कोरोनाबाबत शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे धक्कादायक विधान.
सांगली : गोमूत्र आणि गायीचे तूप हे अति तीव्र जंतुनाशक आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कोरोना बाधित रुणांच्या वर गोमूत्र आणि गायींच्या तुपाचा उपयोग करावा. त्याच्या ण्यापिण्यात सुद्धा गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे खळबळजनक वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केले आहे. सांगली मध्ये भिडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, इस्लामपूरतील त्या कोरोना बधितांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करावा. त्या रुग्णांनी इतरांचे जीव बेफिकीरीने धोक्यात घातले, अशी मागनी संभाजी भिडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांना राष्ट्रीय आपत्ती कायद्यान्वये बंदिस्त करा, तसेच चीन हा देशच कोरोना आहे, त्याच्यावर पाच वर्षे बहिष्कार घालण्याची मागणी ही भिडेंनी केली.
सांगलीत जिल्ह्यात १२ संशयित रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणाला मोठा धक्का बसला. सांगलीतील इस्लामपुरात हे १२ नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या २३ वर पोहोचली. महत्त्वाचे म्हणजे इस्लामपुरात जे १२ नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या चार कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, २५ मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी १२ जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच कुटुंबातील २३ जणांना बाधा झाल्याने राज्य शासनाने खबरदारी घेत इस्मलापूर लॉकडाऊन केले.
या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. चार दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.
इस्लामपुरातील या कुटुंबातील आधी चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती २३ मार्चला समोर आली होती. हे चारही जण नुकतेच सौदी अरेबियातून आले होते. ते हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होते. त्या चौघांचे कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली. या सर्वांवर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.