पुणे : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे यंदाच्या वर्षाचा दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांना आता भुगोल विषयाचे मार्क मिळणार आहेत. उर्वरित इतर विषयांच्या लेखी परीक्षेच्या मार्कांची सरासरी काढून भुगोल विषयाचे मार्क देण्यात येतील, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. तसंच दिव्यांगांसाठी असणाऱ्या कार्यशिक्षण या विषयाचे मार्कही सरासरी पद्धतीनेच दिले जातील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणतात...


कोरोना लॉकडाऊनमध्ये सीबीएसईची परीक्षांबाबत मोठी घोषणा​


कोरोना व्हायरसच्या वाढता प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर बाकी होता. सुरुवातीला अनिश्चित काळासाठी हा पेपर पुढे ढकलण्यात आला होता, पण कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, अखेर हा पेपर रद्द करण्याची घोषणा करण्यात आली.