बुलडाणा : कोरोनाचे संकट थांबण्याचे नाव घेत नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णात आणखी एकाची भर पडली आहे. आणखी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता कोरोना सदृश्य रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. बुलडाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय तर चार जणांवर उपचार सुरु आहे. आणखी तीन रुग्णांच्या रिपोर्ट्सची प्रतिक्षा आहे.


 मेडिकल बंद, रुग्णांचे हाल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असल्याकारणाने अनेक नियम लागू झालेले आहेत. अशातच जीवनावश्यक वस्तू असतील किंवा मेडिकल आणि दवाखाने हे सर्वसामान्यसाठी उघडे ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी ते पाळताना दिसून येत नाही. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मेडिकलमध्ये औषधांचा पुरवठा होत नसल्याने मेडिकल बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत.



कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द


कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावामुळे रामनवमीनिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रामजन्मदिनानिमित्त बहुतेक सर्व राम मंदिरात काही दिवस मोठे उत्सव साजरे केले जातात. मात्र हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुंबईतल्या प्रसिद्ध अशा वडाळ्याच्या राम मंदिरातही अशीच परिस्थिती आहे.