नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. इथल्या मसाला बाजारमध्ये कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळला आहे. मसाला मार्केट मधील व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा व्यापारी चुनाभट्टी येथे राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एपीएमसी मार्केटमध्ये दररोज हजारो लोकांची येजा सुरू असते. कम्युनिटी संसर्गची भीती सत्यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने एपीएमसी प्रशासनाची धावपळ सुरू आहे. 


संबंधीत व्यापार्याच्या दुकानामध्ये काम करणारे कर्मचारी, सामान उचलणारे माथाडी कामगार, खरेदीदार यांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. संबंधित कोरोनाग्रस्त व्यापारी आणखी कोणाकोणाच्या संपर्कात आला ? तसेच त्याच्या घरच्या मंडळींची देखील चाचणी होणार आहे. 


खारघरमध्ये चौथा रुग्ण आढळला. आता संख्या इथली कोरोनाग्रस्तांनी संख्या २१ वर गेली आहे.



मुंबईत रुग्ण वाढले 


आज मुंबईत कोरोनाचे १०६ नवे रुग्ण आढळले आहेत.  त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ६९६ वर गेली आहे. यातील पाच जणांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ४५ झाली आहे. तसेच ५९ रुग्ण बरे झाले आहेत.