पुणे-दिल्ली विमानात कोरोनाचा संशयित रुग्ण
चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना वायरसची जगभरात दहशत
पुणे : चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोना वायरसची जगभरात दहशत पसरली आहे. या वायरसने अनेक बळी घेतले आहेत. पुणे-दिल्ली विमानात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात या रुग्णावर तपास आणि उपचार सुरु आहेत.
आज सकाळी दिल्लीहून पुण्याला विमान आलं. यामध्ये एक चिनी नागरिक होता. त्याला उलट्या झाल्या. या संशयित रुग्णामुळे विमान थांबवण्यात आले. त्याला कोरोनाची लागण झाली की नाही ? हे अजून स्पष्ट झाले नाही.