नवी दिल्ली : कोरोना व्हायरसग्रस्त वुहानमध्ये मेडीकल सामुग्री पोहोचवण्यासाठी आणि त्याठिकाणच्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी सज्ज असलेल्या विमानाला परवानगी देण्यासाठी चीन हेतुत: उशीर करत असल्याचा आरोप भारतानं केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपान, युक्रेन आणि फ्रान्स यांच्या विमानांना परवानगी दिली असताना भारतीय विमानास परवानगी देण्याबाबत चीन चालढकल करत असल्याचा आरोप भारतानं केलाय. दरम्यान चीन दूतावासातील प्रवक्त्यानं भारताचा आरोप फेटाळलाय. 



कोरोनाग्रस्त हुबेई प्रांत आणि वुहान शहरात अजूनही काही भारतीय अडकलेत. चीनला वैद्यकीय मदत पाठवण्याबरोबरच तिथल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताचं सी १७ हे लष्करी विमान सज्ज आहे. 


हे विमान खरं तर २० फेब्रुवारीला चीनला रवाना होणं अपेक्षित होतं. पण त्याला अजून परवानगी मिळालेली नाही दरम्यान भारताने याआधी ६४० नागरिकांना वुहान येथून भारतात परत आणलं होतं.