मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.तसंच कोरोनाशी लढताना मध्ये राजकारण आणू नका, असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलत आहे, तसंच गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही बोलत आहे. सोनिया गांधी यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. शरद पवार यांच्यासोबत नेहमीच बोलणं होतं. राजही आमच्या सोबत आहे, असं उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधताना म्हणाले. तसंच मालेगावमधल्या मुल्ला-मौलवींशीही आपण चर्चा केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 


मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतमालाची दुकानं सुरू राहणार


शेतमालाची वाहतूकही सुरू राहणार


देशात सर्वाधिक चाचण्या मुंबईत


प्लाझ्मा ट्रिटमेंटबाबत प्रयोग सुरू, परवानगीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला


तज्ज्ञ डॉक्टरांची टास्क फोर्स


अनुभवी आणि तज्ज्ञ आर्थिक धोरण ठरवणार


१० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले


केंद्र आणि राज्य हातात हात घालून चाललंय


शिवभोजनची व्याप्ती ८० हजार जेवणापर्यंत


५.३० ते ६ लाख मजुरांना न्याहारी आणि जेवण


मजुरांची खबरदारी घेतल्यानंतरही त्यांची अडचण


घरी जायची गरज नाही, त्यांची आम्ही काळजी घेतोय


१४ तारखेपासून ट्रेन सुरू होईल असं त्यांना वाटलं असेल, म्हणून वांद्रे स्टेशनवर गर्दी झाली


महाराष्ट्रात तुम्ही सुरक्षित, घाबरायची गरज नाही 


लॉकडाऊन उठेल तेव्हा आम्ही आणि केंद्र सरकारही तुमची मदत करेल 


गोरगरीब लोकं आहेत, याचं राजकारण करू नका


ट्रेन सुरू होण्याची अफवा पसरवली


यांना हाताशी धरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला, तर त्याला राज्य सरकार सोडणार नाही


आपल्याकडे आगीचे बंब भरपूर, ही आग पसरवू देणार नाही


मोदी, अमित शाह, सोनिया गांधी, शरद पवार, राज ठाकरेही आमच्यासोबत आहेत


मालेगावच्या मुल्ला-मौलवींशी बोललो