दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भारतामध्ये १ जून ते ३० जून अशा लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची केंद्र सरकारने घोषणा केली. यानंतर महाराष्ट्रातलाही लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातला लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरी काही बाबतींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राज्य सरकारने लॉकडाऊन ५ बाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नव्या नियमावलींनुसार राज्यातील शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लास, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो, लोकलसेवा, स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळं, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार आहेत. 


या लॉकडाऊनमध्ये कंटेंन्मेंमट झोनमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सुट देण्यात आली आहे. यात सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांची वापर करता येणार, मात्र दूर जाण्यास मनाई आहे.


असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०