योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : नाशिक जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल शासकीय रुग्णालय यांच्यातील सुमारे दोन हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद आतापर्यंत अपडेट करण्यात आली. यामुळे कोरोना मृत्यूच्या नोंदी जाणून अपडेट करण्यात आल्या नाहीत असे आरोप होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर  खाजगी रुग्णालयात सोबत शासकीय रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत . हे लक्षात आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नोडल अधिकारी अनंत पवार यांना नोटीस बजावण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 केवळ आकडेवारी गोळा करण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करून माहिती देण्यासाठी अधिकार्‍यांची विशेष असे नियुक्ती करण्यात आली होती त्या व्यतिरिक्त त्याला कुठलेही काम देण्यात आले नव्हते. जर आधीपासून अन्य सर्व नोंदी अपडेट ठेवता आल्या होत्या, तर केवळ बळींच्याच नोंदी अपडेट न ठेवण्यामागे हेतूपुरस्सर दिशाभूल करण्यात आल्याचे दिसून आला आहे .


लाटेत सर्वच रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण असल्याचे सगळ्यात मोठे कारण यंत्रणेने पुढे केले होते . त्याचबरोबर फॅसिलिटी ऍप कार्यान्वित न होणे , इंटरनेट कनेक्टीव्हीटीच्या अडचणी , प्रयोगशाळेतून रुग्णांचा आयसीएमआरआयडी वेळेत प्राप्त न होणे , डाटा एंट्री करणारे कुशल मनुष्यबळ आजारी पडणे , मनुष्यबळाची अनेक अनुपलब्धता अशी कारणे पुढे करण्यात आली होती.


 जर असेल तर केवळ मृत्यूंची आकडेवारी अपडेट का झाली नाही हा प्रश्न निर्माण होतोय त्याचबरोबर एखाद्या अधिकारी केवळ मृत्यूंची आकडेवारी अपडेट न करण्याची हिंमत कशी करू शकतो असेही प्रश्न समोर आलेत.  यामुळे एकूणच प्रशासनाने समन्वयाने केलेली घोडचूक आता एखाद्या अधिकार्‍याच्या माथी मारून त्याला नोटीस देण्याचं नाटक केले जात आहे.


अशा अनेक नोटिसा वेगवेगळ्या वादग्रस्त घटनां वेळ देण्यात आले आहेत. मात्र त्याची पुढे चौकशीही झाली नाही व जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रोखण्याची ही एक चाल असल्याची चर्चा नाशिकच्या आरोग्यक्षेत्रात रंगली आहे.