मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १००च्या जवळ पोहोचला आहे. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे आणखी २३ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातली एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ९७वर पोहोचली आहे. त्याआधी शनिवारी १२ नवे रुग्ण आणि रविवारी १० रुग्ण आढळले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीच्या ४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सांगलीच्या एकाच कुटुंबातील लोकं हज यात्रेसाठी गेले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. या चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.


महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज फिलपिन्सचा रहिवासी असलेल्या ६८ वर्षांच्या रुग्णाचं निधन झालं. याआधी मुंबईमध्येच आणखी दोघांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता.


मुंबईमध्येच कोरोनाचे सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुण्यात १६ आणि पिंपरी चिंचवडमध्ये १२ रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्राच्या १५ शहरांमध्ये आतापर्यंत कोरोना पोहोचला आहे. कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यभर कर्फ्यूची घोषणा केली आहे.


राज्यातील एकूण रुग्ण- ९७


मुंबई- ४१, मृत्यू ३


पुणे- १६


पिंपरी चिंचवड- १२


नागपूर- ४


यवतमाळ- ४


कल्याण-४ 


नवी मुंबई- ४ 


सांगली-४ 


अहमदनगर-२ 


पनवेल-१ 


ठाणे-१ 


उल्हासनगर- १ 


औरंगाबाद- १ 


रत्नागिरी- १ 


सातारा- १