मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यंत चार रुग्ण आढळून आले आहेत. काल रात्री खेड येथील कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती दुबई येथून खेड येथे आली होती. खेड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मित्रा यांनी दिली. दरम्यान, पहिला रुग्ण हा गुहागर तालुक्यात शृंगारतळी येथे आढळून आला. हा रुग्ण दुबईतून प्रवास करुन आला होता. त्यानंतर राजिवडा येथे रुग्ण आढळून आला. तिसरा रुग्ण साखरतर येथे आढळाला होता. ही महिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय रुग्णालायत ६ एप्रिल येथे या रुग्णाला दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. रत्नागिरीत आतापर्यंत चार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. गुहागर येथील पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता दोन रुग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


मृत्यू झालेला रुग्ण दुबईहून भारतात आला. त्यानंतर खेड येथे आला होता. कोरोनामुळे रुग्ण मुत्यू होण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. प्रशासनाने तत्काळ अलसुरे गाव सील केले आहे. तेथील लोकांचा सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. प्रशासन सतर्क झाले असून सगळी आरोग्य यंत्रणा कार्यन्वित झाली आहे. पोलिसांनी विशेष लक्ष या भागावर केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात १०२१ जणांना  होम क्वारंटाईन करण्याता आले आहे.