मुंबई: राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांची विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांतील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर अमरावतीमध्ये आता नव्या कोरोनाच्या स्ट्रेनचा शिरकाव झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल देशमुख यांनी ही शक्यता वर्तवली आहे. अमरावती जिल्ह्यात 20 दिवसांपासून नव्या स्ट्रेनचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. अद्यापही या नमुन्यांचा अहवाल आलेला नाही. 18 फेब्रुवारीला पुण्यातील लॅबमध्ये 20 जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र त्याचा अहवाल अद्यापही प्रलंबित आहे. जिल्हा शल्य चिकित्सक श्याम सुंदर निकम यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


अमरावती जिल्ह्यात रुग्णात वाढ झाली आहे.  दिवसभरात तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाल आहे. तर जिल्ह्यात 282 कोरोना बाधित रुग्णात वाढ झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 40268 रुग्ण आढळले. 


उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार?


जिल्ह्यात आतापर्यंत 33821 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोना बाधित  5875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत यासह जिल्ह्यात आतापर्यंत 572 कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला 


नागपुरातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 338 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात शहरातील 1 हजार 49 तर ग्रामीण भागातील 286 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे काल दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.