मुंबई : देशभरात अतिशय झपाट्यानं वाढणाऱ्या coronavirus कोरोना व्हायरस कोविड 19 या विषाणूचा संसर्ग महाराष्ट्रातही अतिशय वेगानं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दर दिवशी कोरोना रुग्णसंख्येत हजारोंच्या आकड्यानं भर पडत आहे. सोमवारी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात ११,९२१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या रुग्णांचा आकडा पाहता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,५१,१५३ वर पोहोचली आहे. ज्यामध्ये ३५१ मृत्यू आहेत. तर, १०,४९,९४७ रुग्णांना कोरोनावरील उपचारांनंतर रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 


सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्यात २,६५,०३३ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असली तरीही, रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही समाधानकारक आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल १९,९३२ रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आलं. तर, १८० मृत्यूंची नोंद करण्यात आली. 



 


रुग्ण बरे होण्याचं हे प्रमाण पाहता याची एकूण टक्केवारी ७७.७१ % इतकी झाली आहे. गेल्या बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळं निर्माण झालेली आव्हानं शासन आणि आरोग्य यंत्रणांकडून पेलण्यात येत आहेत. राज्यात या घडीलाही कोरोनाचा धोका कमी झालेला नसला तरीही सावधगिरी बाळगत त्यापासून दूर राहण्यालाच अनेकजण प्राधान्य देत असल्याचं स्पष्ट होत आहे. रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार घेणारे रुग्ण वगळता सध्या संपूर्ण राज्यात १९,७५,९२३ जण होम क्वारंटाईन आहेत, तर २९,९२२ जणांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.