विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : जगभरात कोरोनाच्या (Corona) ओमायक्रॉन व्हेरियंटनं (Omicron Variant) चिंता वाढवली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लंडनच्या इम्पिरिकल कॉलेजने ( Imperial College London ) कोविड-19 रुग्णांचं (Covid-19) सर्वेक्षण केलं. यात चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-19 मुळे वीर्याची क्षमता घटली?


व्हायरसमुळे स्पर्म काऊंट, म्हणजे शुक्राणूंची संख्या 37 टक्के तर त्यांची गतीशीलता किंवा स्पर्म मोटिलिटी तब्बल 60 टक्क्यांनी घटत असल्याचं या सर्वेक्षणात समोर आलं आहे. कोविडमधून बरे झाल्यानंतर अनेक महिने स्पर्म क्वालिटी खराब राहात असल्याचंही निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. त्याच वेळी वीर्याला विषाणू संक्रमण होत नसल्याचंही अभ्यासात स्पष्ट झालं आहे. 


विकी डोनर गायब


एकीकडे स्पर्म क्वालिटीवर परिणाम झाला असतानाच कोरोनाच्या साथीमुळे देशातील विकी डोनर आणि मिमी गायब झाल्याचं चित्र आहे. लॉकडाऊनमुळे फर्टिलिटी सेंटर आणि वीर्य बँका बंद आहेत. शिवाय कोरोनानंतर बाळ होऊ द्यायचं की नाही, याचा विचार जोडपी करू लागली आहेत. त्यामुळे टेस्ट ट्यूब बेबी आणि सरोगसीचा जन्मदर शून्यावर आलाय. परिणामी राज्यातील 300 ते साडेतीनशे फर्टिलिटी सेंटर्स अडचणीत सापडली आहेत. 



कोरोनानंतर घ्यायची काळजी आणि आयव्हीएफबाबत आयसीएमआरनं 34 पानी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. स्त्रीरोगतज्ज्ञ आणि फर्टिलिटी सेंटर्स त्यानुसार काम करत असले तरी कोरोनामुळे वीर्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम चिंता वाढवणारा ठरतोय.