चांगली बातमी, कोरोनामुक्त झालेले लोक अवयवदान करू शकतात!
कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले.
औरंगाबाद : कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यांना काहीही अडचण नाही उगाच अफवा नको, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे येथे म्हणाले. दरम्यान, UK च्या दुसऱ्या स्ट्रेनचा अद्याप एकही रुग्ण नाही. ४३ नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉसिटीव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळे घाबरायचे कारण नसल्याचे टोपे यांनी सांगितले.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका पाहता कालपासून औरंगाबादमध्ये परदेशातून कुणीही आले तर त्याला सात दिवस क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले. याबाबतचा निर्णय औरंगाबाद महापालिकेने घेतला असून कालपासून याची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाच्या आदेशानुसार विदेशातून आणलेल्या प्रत्येक व्यक्तीची rt-pcr पद्धतीने कोरोना चाचणी केली जात आबे, त्यातच आता परदेशातून आलेल्या नागरिकांना सात दिवस क्वारंटाईन करण्याची सोय सुद्धा महापालिकेने केली आहे.
ज्यांना हॉटेलमध्ये राहायची इच्छा असेल ते हॉटेलमध्ये सुद्धा जाऊ शकतात, क्वारंटाईनचे दिवस पूर्ण झाल्यावर या नागरिकांची पुन्हा चाचणी केली जाईल आणि जर ते निगेटिव्ह आले तर त्यांना घरी सोडलं जाणार, घरी गेल्यानंतरही त्यांना चौदा दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत इंग्लंड मधून आलेले दोन जण पॉझिटीव्ह आढळले आहेत.
महाराष्ट्रात UK च्या दुसऱ्या स्ट्रेंनचा अद्याप एकही रुग्ण नाही. ४३ नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेंनचा पॉसिटीव्ह रुग्ण सापडला नाही. त्यामुळं घाबरायचे कारण नसल्याचे टोपे यांनी सांगितले, महाराष्ट्र देशात पाहिले राज्य आहे ज्यांनी UK मधील फ्लाईट थांबवल्या असेही टोपे यांनी सांगितले. विदेशातून येणाऱ्या सगळ्या प्रवाश्यांना इन्स्टिटय़ूशनल क्वारेनटाईन करत आहोत. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात असल्याचं ते म्हणाले.