पुणे : देशात 10 जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढता दिसत आहे. यात राज्यातील 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक रुग्ण हे पुणे (Pune) जिल्ह्यात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने मोठी चिंता व्यक्त होत होती. तसेच गंभीर बाब म्हणजे पुण्यात दररोज होणाऱ्या मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. यामुळे आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेली नागरिकांना कडक इशारा दिला आहे. तु्म्ही जर कोविडचे नियम पाळणार नसाल तर नाईलाजाने लॉकडान लागू करावा लागेल, असा थेट इशारा अजित पवार यांनी दिला आहे. (Coronavirus : Lockdown if Covid rules are not followed - Ajit Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा आकडा मुंबईपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलीस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना कडक इशारा दिला आहे. त्यामुळे पुण्यात कठोर निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. मी आपल्याला सांगू ईच्छितो 2 एप्रिलपर्यंतचा वाट पाहणार आहे. घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या 2 एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा थेट अल्टिमेटम त्यांनी यावेळी दिला. 


राज्यात कोरोनाची स्थिती चिंता जनक आहे. कोरोचा उद्रेक हा पुण्यात पाहायला मिळत आहे. परिस्थिती गंभीर बनत चालली परिस्थिती अशीच राहिली तर  कठोर निर्णय घ्यावा लागेल. नागरिकांनी नियम पाळणे आवश्यक. लसीकरण केंद्र दुप्पट करण्याचे नियोजन आहे. लसीकरण वाढवणे यावर भर देण्यात येणार आहे. हॉस्पिटलमधील खाटांची संख्या वाढवणे यावर भर द्या, खासगी हॉस्पिटलमधील 50 टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्यात.


केंद्र सरकारकडून होत असलेला लस पुरवठा कमी पडण्याची शक्यता आहे. पुरेसा लस पुरवठा व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. तसेच लग्न समारंभ साठी 50 आणि अंत्यविधी साठी 20 लोकांनाच परवानगी असेल. शाळा, महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार आहेत. सार्वजनिक वाहतूक सुरू राहील.
दुकाने, मॉल, थिएटर आधीच्या नियमानुसार सुरू राहतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.


पुण्यातील जम्बो हॉस्पिटल सुरु करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मधील जम्बो हॉस्पिटल 1 एप्रिल पासून सुरू करणार आहोत. रुग्ण संख्या कमी न होता वाढत गेली तर नाईलाजास्तव लॉकडाउन करावा लागेल. पुढच्या शुक्रवारी याबाबतचा निर्णय होईल. MPSC परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. तर 10 वी 12 वी च्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. लॉकडाऊनमुळे गोरगरिबांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होतो तो होऊ द्यायचा नसेल तर नियम पाळा आता कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागेल, असे ते म्हणाले.