मुंबई : कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासूनच राज्यातील नागरी भागात कलम १४४ लागू केले आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रात 'लॉक डाऊन' करण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात रेल्वे, बस सेवा, एसटी आणि खासगी बसेसही बंद करण्यात आल्या आहे. फक्त जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा चालविली जाणार असल्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक कार्यालयांना वर्क फ्रॉम होम पद्धतीने कामकाज करण्याच आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. सरकारी कार्यालयांती उपस्थितीसुद्धा अवघ्या पाच टक्यांवर आणली असून फक्त अन्नधान्य, भाजीपाला, औषधे, दुकानेच सुरू राहणार असल्यांच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 



राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. रविवारी राज्यात १० नवीन कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी पुण्यात ४, मुंबईत ५ तर नवी मुंबईत १ असे रूग्ण सापडले आहेत. राज्यात कोरोनामुळे ६३ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून राज्यातील हा दुसरा बळी आहे. 




पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाल्याने रविवारी पुकारलेला 'जनता कर्फ्यु' अभूतपूर्व यशस्वी झाला. हा 'जनता कर्फ्यू' हा सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत वाढवला आहे.