मुंबई : राज्यात कोरोनाचा  फैलाव होत आहे. लॉकडाऊनमुळे सर्व शहरे धावायची थांबली आहेत. अनेक ठिणाकी वस्तूंचा आणि भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी नागरिक गर्दी करताना दिसून आले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने नवी मुंबई कृषी बाजार समिती पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे सावट यामुळे योग्यती खबरदारी घेण्यात येत आहे.


अशी असणार नियमावली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबई बाजार समितीचे सचिव , कोकण विभागीय आयुक्त, संचालक ,महासंघाचे पदाधिकार , माथाडी संघटनेचे नेते आणी नवी मुंबई पोलीस यांची संयुक्तीक सभा काल झाली. यावेळी बाजार समिती सुरु ठेवण्या बाबत नियम आणि नियमावली बनवली आहे. या आवक जावक साठी प्रत्येकी एकच गेट सुरु ठेवण्यात येणार आहे. आवक गेट ला शेतमालाची गाडी आल्यावर ड्रायव्हर व क्लिनर ला खाली उतरवून त्यांची प्रथम वैद्यकीय तपासणी करून मास्क व सॅनिटराईज करुन आता सोडले जाईल व गाडी पूर्ण पणे जंतुनाशकाने फवारणी करूनच मार्केटमध्ये सोडली जाईल


व्यापार करतान दुकानावर मावेल (क्षमते नुसार ) एवढाच शेतमाल मागवणे आणि फक्त दुकानावरच माल खाली करून विक्री करणे , अन्य ठिकाणी माल विक्री करता येणार नाही. मार्केटमध्ये पहाटे चारपर्यंत शेतमालाच्या गाड्या आत घेतल्या जातील आणि त्यानंतर शेतमालाच्या गाडीला प्रवेश देणार नाही , एक तासात मालाच्या गाड्या खाली करून मार्केटच्या बाहेर काढण्यात येत आहेत.


पहाटे ४.३० वाजल्यानंतर ग्राहकांना पूर्ण वैद्यकीय तपासणी करुन सॅनिटराईज करून मास्क देऊन मार्केटमध्ये सोडले जात आहे व गाडी पूर्ण पणे जंतुनाशकाने फवारणी करुनच मार्केटमध्ये घेतली जाणार आहे.


फोटो ओळखपत्र बंधनकारक


व्यापाऱ्यांना पहाटे ५ ते १० याच वेळेत मालाची विक्री करता येणार आहे , याची काटेकोर अमंलबजावणी होणार आहे ११ वाजता मार्केटचे गेट बंद केले जाईल. शुक्रवार २७ /३ /२०२० पासून भाजी व्यवसायातील प्रत्येक मदतनीस, कामगार,गाळेधारक ईतर सर्व घटकास फोटो ओळखपत्र देण्यात येईल ,शेतमाला ची वाहतुक करणार्या प्रत्येक घटकास वाहन स्टीकर देण्यात येणार आहे ,ही प्रक्रिया सुरूच रहाणार आहे ,


 Apmc प्रशासनास NMMC प्रशासनाने आवश्यकता असेल त्या भागात व्यापारी मदतनिस ,कामगार, ग्राहक यांना गरज असल्यास किंवा मागणी केल्यास परिवहन सेवा देण्याची जबाबदारी NMMC ने घेतली आहे. सर्वात महत्वाचे वरील सर्व नियंत्रण हे नवी मुंबई पोलीस यांचे अखत्यारीत सतत होणार आहे याची सर्व घटकानी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


वरील सर्व नियोजन हे बाजार समिती व पोलीस प्रशासन करणार आहे त्यात बाजार आवारातील कोणतीही संघटना व महासंघ हस्तक्षेप करणार नाही. तसेच माथाडी कंपनीची मजुरी सर्वांना रोखीने द्यावी लागेल. दर गुरुवार व रविवार रोजी मार्केट संपूर्ण बंद राहील व त्याचे काटेकोर पालन होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.