पुणे : पुण्यात कोरोना (Pune Coronavirus New Rules Update) रोखण्यासाठी नवी नियमावली जाहिर करण्यात आली आहे. सार्वजनिक, गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी होणार असून  नियम मोडणा-यांवर कठोर कारवाई देखील करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुधारित आदेश जारी केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत प्रशासनाकडून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी अचानक तपासणी होणार असून नियमांच उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई होणार आहे. 


नवीन नियमावली आणि उपाययोजना 


- मास्क वापरणे अनिवार्य, मास्क नसेल तर 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा मास्क न घातल्याचे आढळल्यास 1000 रुपये दंड
- मास्क कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना
- लग्न समारंभासाठी 50 पेक्षा जास्त लोक नकोत
- धार्मिक स्थळे तसेच प्रार्थना स्थळांमध्ये गर्दी झाल्यास कारवाई
- सरकारी कार्यालयांत गर्दी टाळण्यासाठी नोडल ऑफिसची नियुक्ती


पुणे जिल्ह्यात कोरोनाचे 527 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 280 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यात 19 फेब्रुवारीला 7 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 2 हजार 399 !!ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी 159 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वाढत्या कोरोनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. डिसेंबर महिन्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा 6 हजाराच्या जवळ आहे. यामुळे राज्य लॉकडाऊनच्या दिशेने जात असल्याचा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.