मुंबई : coronavirus कोरोना व्हायरसचा राज्यात वाढणारा प्रादुर्भाव दिवसागणिक चिंता वाढवणारा विषय ठरत आहे. काही भागांमध्ये कोरोना नियंत्रणात येण्याची चिन्हं दिसत नाहीत, तोच राज्यात नव्यानं आढळणाऱ्या कोरोना रुग्णांचा आकडा नवी आव्हानं उभी करत आहे. शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात एकूण १०४८३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णांचा हा आकडा गुरुवारच्या तुलनेत कमी असला तरीही चिंता मात्र कायम आहे. कारण, एका दिवसात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी ३०० जाणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 


१० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाल्यामुळं आता राज्यातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा ४,९०,२६२ वर पोहोचला आहे. यामध्ये सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १,४५,५८२ इतकी आहे. तर, कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा समाधानकारक आहे. 


आतार्यंत ३,२७,२८१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. राज्यात कोरोनामुळं आतापर्यंत १७,०९२ जणांचे प्राण गेले असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली आहे, 




देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या संख्येनं वाढत आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण आरोग्य विभागासाठी काम करणाऱ्या यंत्रणा आणि प्रशासनापुढं नवे पेच निर्माण करत आहे.