नवी मुंबई : कोरोना व्हायरचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबईत दुबईतून आलेल्या नागरिकांना खारघरच्या ग्रामविकास भवनात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या भीतीने खारघरमधील ग्रामविकास भवनाचे कर्मचारी फरार झाल्याने एकच गोंधळ झाला आहे. पळालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार येणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांनी आदेश दिले आहेत.


आरोग्य विभागाला चिंता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात ३३ रुग्ण आढळले असून सर्वात जास्त १६ रुग्ण पुण्यात आहेत. त्या खालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झालीय. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.



पोलीस बंदोबस्त तैनात 


कोरोना व्हायरसचे उपचार सुरू असताना विविध कारणांमुळे कोरोनाचे संशयित रुग्ण पळून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णलयांबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची महिती राजेश टोपे यांनी दिलीय.


पळून जाणे कायद्याने गुन्हा 


कोरोनाच्या आयसोलेशनं वॉर्डमधून पळून जाणे कायद्याने गुन्हा आहे. अशा रुग्णांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीसीच्या विविध कलमांनूसार गुन्हा दाखल होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी नागपूर, आग्रा इथून कोरोनाचे रुग्ण पसार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.